भाजपकडून मिशन लोकसभेची तयारी सुरु; विद्यमान खासदारांच्या कामगिरीवर बारीक लक्ष

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोमाने तयारी सुरु केली आहे. भाजपने (BJP Mission 45+) तर राज्यात मिशन ४५ सुरु केले आहे. त्या दिशेने भाजपने काम करण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान खासदारांच्या कामगिरीवर भाजपचे बारीक लक्ष असून या सर्व बाबींचा विचार करुन राज्यात लोकसभा निवणुकीत भाजपमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

त्या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर असताना राज्यातील खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. मुंबईतही काही जागांवर बदल होण्याची शक्यता असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

सुमार कामगिरी असलेल्या भाजपच्या खासदारांना आगामी निवडणुकीत डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे राज्यातील दौरे देखील वाढले आहेत. भाजपकडून प्रत्येक उमादवाराचे रिपोर्ट कार्ड बनवले गेले असल्याचे एका वृत्तवाहीनीने म्हंटले आहे.

त्यानुसार भाजपमधील सुमार कामगिरी असलेल्या खासदारांचे तिकीट आता कापले जाण्याची शक्यता असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे. भाजपला राज्यात मिशन ४५ + राबवायचे आहे. त्यासाठी आता महत्त्वपुर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सवानंतर भाजपची ऑक्टोबरमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे. भाजप प्रदेश कार्यकारणीची ३ ऑक्टोबरला मुंबईत ही बैठक होऊ शकते. यावेळी मिशन ४५+ च्या दृष्टीने कार्यकारिणीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपची वसंत स्मृती येथे ही बैठक पार पडेल.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *