Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशदिल्लीतील पत्रकारांच्या घरी छापे; चीनकडून निधी मिळाल्याचा आरोप

दिल्लीतील पत्रकारांच्या घरी छापे; चीनकडून निधी मिळाल्याचा आरोप

दिल्ली | Delhi

एका न्यूज पोर्टलशी संबंधित ९ पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी सकाळी छापेमारी केली. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा अर्थात UAPA कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या घरीही पोलिसांनी छापेमारी केली असून यामध्ये मुंबई पोलिसांचाही समावेश आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी जी छापेमारी केली आहे, यासंदर्बात १७ ऑगस्ट रोजी भादंवि UAPA (बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा) आणि १५३ अ (दोन गटातील द्वेषाला प्रोत्साहन देणं) तसेच १२० ब (गुन्हेगारी कट) या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पत्रकार अभिसार शर्मा, उर्मिलेश, अवनिंदो चक्रवर्ती आणि इतर सहा पत्रकारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विविध ३० ठिकाणी छापेमारी टाकून दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तसेच तीस्ता सेटलवाड यांच्या मालमत्तेवरही छापे टाकण्यात आले आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी हे शोध कार्य केले. त्यानुसार, संशयित बेकायदेशीर कृती पोलिसांना आढळून आल्या आहेत. ईडीच्या तपासात तीन वर्षांच्या अल्प कालावधीत ३८.०५ कोटी रुपयांच्या विदेशी निधीची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. न्यूज पोर्टल आणि त्याचे संस्थापक/संपादक यांच्याशी संलग्न निवासस्थाने आणि इमारतींवरही पोलीस छापे टाकत आहेत. तिस्ता सेटलवाड यांच्या घरासह मुंबईतही छापे टाकण्यात आले . दरम्यान, कॉमेडियन संजय राजौरा याला लोधी कॉलनीतील स्पेशल सेलच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या