Friday, April 26, 2024
Homeनाशिकयेवला : बेशुद्ध पडलेल्या ग्रामसेवकास पत्रकाराने केले रुग्णालयात दाखल

येवला : बेशुद्ध पडलेल्या ग्रामसेवकास पत्रकाराने केले रुग्णालयात दाखल

येवला । yeola

तालुक्यातील पुराणगाव येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवक येवला बसस्थानकाकडे येत असताना अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ एका पत्रकाराने मदत करीत माणुसकी जपली आहे.

- Advertisement -

मुळचे कळवण येथील असलेले व सध्या येवला तालुक्यातील पुराणगाव येथे सेवेत असलेले ग्रामसेवक श्री उत्तम शिवराम चौधरी हे पंचायत समिती येवला येथून येवला बस स्थानकाच्या दिशेने जात असताना अचानकपणे त्यांना भोवळ आल्याने बेशुद्ध होऊन पडले.

यावेळी करोरोनाच्या भीती मुळे त्यांना स्थानिक नागरिक देखील मदत करण्यास पुढे जात नव्हते. यावेळी जवळच असलेल्या पत्रकार सुदर्शन खिल्लारे यांना हि माहिती समजली.

त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रस्त्यातून उचलत बाजूला केले. लागलीच १०८ या शासनाचा रुग्णवाहिके साठी कॉल केला मात्र बराच वेळ कॉल करून संबंधित यंत्रणा फोन उचलायला तयार नव्हती.

हे पाहताच पत्रकारांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून ग्रामसेवक चौधरी यांना तात्काळ येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या