Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकविविध संस्थांचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

विविध संस्थांचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा व नाशिक शहरातील पत्रकार, प्रसारमाध्यम संस्था, सामाजिक संघटना यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारार्थीत दैनिक देशदूतचे दिनेश सोनवणे, फारुक पठाण, लक्ष्मण पवार( सुरगाणा), वैभव केदारे (देवळा) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ, नाशिक तालुका पत्रकार संघ, खतीब-ए-नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी तसेच अल मोईन फाऊंडेशन, शाह सादीक अकॅडमी, ताजे नुरी अकॅडमी यांच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले आहे.

तसेच आयएमए नाशिक शाखेच्या वतीने करोना काळात उल्लेखनीय काम करणार्‍या पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

यात ज्येष्ठ पत्रकार स्व.गंगाधर खुटाडे स्मरणार्थ जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुभाष शहा यांना व ज्येष्ठ पत्रकार स्व. सुरेश अवधूत यांच्या स्मरणार्थ जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कल्याणराव आवटे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच देशदूतचे दिनेश सोनवणे (नाशिक), लक्ष्मण पवार (सुरगाणा), वैभव केदारे (देवळा),ज्येष्ठ महिला संपादिका श्रीमती शकुंतला गुजराथी, संजय दुनबळे, मनीष कुलकर्णी, साई बागडे, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रमणी पटाईत , विजय शिरसाठ, धनंजय बोडके, संदीप ब्रह्मेचा, विठ्ठल भाडुखे, राकेश शिंदे, धनंजय बोरसे, किरण आहेर, संदीप जेजुरकर, अविनाश (बंडू) शिंदे, बाजीराव कमानकर, संदीप ढोक, ज्ञानेश्वर गुळवे, तुषार बिडवे, समाधान पाटील, परिमल चंद्रात्रे, रवींद्र बोरसे, भाऊसाहेब आहिरे, समीर पठाण व सुभाष निकम यांचा पुरस्कारार्थीत समावेश आहे.

मराठी पत्रकार दिनानिमित्त खतीब-ए-नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी तसेच अल मोईन फाऊंडेशन, शाह सादीक अकॅडमी, ताजे नुरी अकॅडमी यांच्या वतीने पत्रकार, लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकारी यांना उत्तम कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक अकरम बिलाल खतीब यांनी दिली. यामध्ये देशदूतचे प्रतिनिधी पठाण फारुक मोहम्मद शफी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येणार. उद्या (दि.6) सकाळी 11 वा. भद्रकाली पोलीस ठाणे शेजारी मौला बाबा सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे.

आयएमएकडून सन्मान

करोना काळात करोनासंदर्भातील माहिती व जनजागृतीचे काम करण्याचे मोठे काम डॉक्टरांबरोबर पत्रकार व प्रसारमाध्यमांनी केले आहे. याची दखल घेत आयएमएच्या वतीने उद्या (दि.6) रात्री 8 वाजता आयएमए सभागृह, नाशिक याठिकाणी पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे.

या जिल्ह्यातील दैनिकांच्या दोन प्रतिनिधी पत्रकारांच्या नावांची घोषणा उद्या केली जाणार असल्याची माहिती आयएमए नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी दिली. यामध्ये देशदूतच्या दोन प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या