Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअभिमानास्पद! नाशिकची जोत्स्ना होणार दिल्ली राजपथ संचलनात सहभागी

अभिमानास्पद! नाशिकची जोत्स्ना होणार दिल्ली राजपथ संचलनात सहभागी

नवीन नाशिक l New Nashik

येथील के. एस. के. डब्ल्यू. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेविका ज्योत्स्ना कदम हिची युवा व खेळ मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली राष्ट्रीय सेवा योजना यांच्याद्वारे राजपथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन-२०२१ पथ संचलनात सहभागी होणार आहे.

- Advertisement -

भारत सरकारच्या रक्षा मंत्रालया मार्फत दरवर्षी राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनी राजपथ नवी दिल्ली येथे पथ संचलन होत असते. त्यात राष्ट्रीय सेवा योजना विभागातील पथ संचलन टीममध्ये महाराष्ट्राच्या संघात नाशिक जिल्ह्यातील के. एस. के. डब्ल्यू. महाविद्यालयातील ज्योत्स्ना कदम हिची निवड झाली आहे.

दरवर्षी जिल्हा, विद्यापीठ, राज्यस्तरीय, क्षेत्रीय निवड चाचणी होत असते. यावर्षी नाशिक जिल्ह्यातून व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संघात तिची निवड झाली.

तसेच हैद्राबाद येथील महाराष्ट्र व गोवा, गुजरात व दीव दमण, आंध्र प्रदेश, तेलंगणा क्षेत्रीय निवड चाचणी शिबिरात महाराष्ट्रातील एकूण ५६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यापैकी नवी दिल्ली येथे पथसंचलन करण्यासाठी महाराष्ट्रातील ७ मुले व ७ मुली एकूण चौदा जणांची निवड झाली आहे.

या सर्व निवड चाचणी शिबिरात वजन, उंची, धावणे, पुश अप्स, चिन अप्स, सांस्कृतिक कलागुण व मुख्यतः परेड बघितली जाते. सर्व प्रकारात सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकांची अंतिम निवड नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलन संघात होत असते.

नाशिक जिल्ह्यातील एकमेव निवड झालेल्या ज्योत्स्ना कदम हिचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस मा. नीलिमाताई वसंतराव पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक नानासाहेब महाले, सचिनजी पिंगळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योत्स्ना सोनखासकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

सदर निवड चाचणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रिय सेवा योजना विभाग, संचालक, डॉ. प्रभाकर देसाई, नाशिक जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र आहिरे, प्रा. पुष्कर पाडेकर, डॉ. डी. के. आहेर व कार्यक्रम अधिकारी प्रा रविराज वटणे, प्रा वर्षा शिरोरे, महाराष्ट्र संघनायक प्रा. शालिनी घुमरे यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या