Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यादीड महिन्यांपासून रिकामे असणारे जॉगिंग ट्रॅक सोमवारी गजबजणार

दीड महिन्यांपासून रिकामे असणारे जॉगिंग ट्रॅक सोमवारी गजबजणार

नाशिक :

राज्य शासनाने लॉकडाउनचे (Lockdown) निर्बंध शिथिल करण्यासाठी ठरविलेल्या निकषानुसार नाशिक जिल्ह्य तिसऱ्या वर्गवारीत आला आहे. यामुळे दुकानांच्या वेळा दुपारी दोनऐवजी चारपर्यंत वाढणार आहेत. सार्वजनिक ठिकाण,पटांगण, वॉकिंग, सायकलिंग रोज सकाळी ५:०० ते ९:०० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

- Advertisement -

ज्येष्ठांना आता कारमध्ये लसीकरणाची सुविधा

नाशिकमधील जॉगिंंग ट्रॅक आता दीड महिन्यानंतर सुरु होणार आहे. इंदिरानगर येथील ट्रॅक मोठा असल्याने येथे लांबून लोक येत होते. रस्त्यांवर वाहतूक सुरु असली तरी या ट्रॅकवर शांतता कायम असते. यामुळे दीड महिन्यानंतर हा जॉगिंग ट्रॅक सोमवारपासून नागरिकांच्या गर्दीने गजबजणार आहे. परंतु व्यायम करतांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या