Friday, April 26, 2024
Homeनगरजोगेश्वरी आखाडा सोसायटीत जनसेवा मंडळाला स्पष्ट बहुमत

जोगेश्वरी आखाडा सोसायटीत जनसेवा मंडळाला स्पष्ट बहुमत

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरीच्या जोगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सोसायटीच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत कारखान्याचे संचालक विजय डौले व नगरसेवक प्रकाश भुजाडी यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठनेते अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जनसेवा मंडळाने अकरा जागा पटकावत एकतर्फी बहुमत मिळवित मोठा विजय पटकावला. विरोधी जगदंबा मंडळाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

रविवारी सकाळी आठ वाजता जोगेश्वरी येथील नगरपालिका शाळेत मतदानास सुरूवात होऊन एकूण 1070 मतदारांपैकी 1008 मतदारांनी मतदान करून निवडणुकीत चुरस निर्माण केली. सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला त्याच ठिकाणी सुरुवात होऊन सात वाजेपर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचलेला निकाल बाहेर आल्यानंतर जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कर्जदार मतदारसंघातून जनसेवा मंडळाचे मावळते चेअरमन संदीप भोंगळ, प्रशांत डौले, सचिन हारदे, सदाशिव गुंजाळ, प्रकाश भुजाडी, संजय येवले, रखमाजी घाडगे तर विरोधी जगदंबा मंडळाचे राजेंद्र मच्छिंद्र काळे हे एकमेव उमेदवार निवडून आले. राखीव मतदारसंघातून जनसेवेचे भगवान राजगुरू यांनी पुन्हा बाजी मारली.

महिला राखीव मतदारसंघातून जनसेवेच्या पुष्पा पांडुरंग भुजाडी व द्रोपदाबाई बाबुराव काळे या दोघी विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय मतदारसंघात विरोधी जगदंबा मंडळाचे प्रदीप नानासाहेब भुजाडी हे सर्वाधिक मतदान घेऊन विजयी झाले. तर भटक्या-विमुक्त मतदारसंघात जनसेवेचे दत्तात्रय तुळशीराम तागड हे मोठ्या मतांनी विजयी झाले.

निकालानंतर जनसेवा मंडळाचे दादासाहेब घाडगे, जगन्नाथ घाडगे, पांडुरंग भुजाडी, गणपतराव भोंगळ, रमेश भुजाडी, नानासाहेब भुजाडी, नितीन डौले, बाबुराव गुंजाळ, बाबुराव काळे, मारुतराव हारदे, बाबासाहेब डौले, आजिनाथ गुंजाळ, डॉ. गुंजाळ, अंबादास काळे आदींसह कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.

जनसेवा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेवराव हारदे यांच्यासह विजयी उमेदवारांनी सर्व मतदारांचे आभार मानले. जनसेवा मंडळाच्या विजयी उमेदवारांचे ज्येष्ठनेते अरुण तनपुरे, ना. प्राजक्त तनपुरे, डॉ. सौ.उषाताई तनपुरे, प्रेरणा उद्योग समूहाचे सुरेशराव वाबळे, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या