Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशG20 Summit 2023 : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे स्वागत करणारी चिमुकली चर्चेत, कोण आहे...

G20 Summit 2023 : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे स्वागत करणारी चिमुकली चर्चेत, कोण आहे ती?

दिल्ली | Delhi

आज राजधानी दिल्लीत (Delhi News) जगभरातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी असणार आहे. जी20 साठी (G20 Summit) जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रपती अन् राष्ट्राध्यक्ष दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. अशातच जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) जी20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत.

- Advertisement -

बायडन यांच्या स्वागताची जबाबदारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली होती. जो बायडन दिल्लीत दाखल होताच व्ही. के. सिंह यांनी त्यांचं स्वागत केलं. पण त्यासोबतच एक चिमुकलीही जो बायडन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होती. सध्या सोशल मीडियावर या चिमुकलीचे फोटो व्हायरल होत आहेत. बायडेन यांच्यासोबत ज्या मुलीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्या मुलीचे नाव माया आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांची ती मुलगी आहे. विमानतळावर बायडेन यांचे स्वागत होताच मायाने त्यांचे स्वागत केले.

माया ही काही आजच प्रसिद्धीला आली आहे असं नाही तर गार्सेटी यांची मुलगी गार्सेटी यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळीही मायाचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोत माया हिब्रू बायबल हातात धरुन उभा होती. गार्सेटी यांनी शपथ घेताना या बायबलवरच शपथ घेतली होती. कोणत्याही मोठा कार्यक्रमामध्ये गार्सेटींची मुलगी माया नेहमीच त्यांच्यासोबत असते अमेरिकेतही निवडणूक रॅलीत किंवा मतदान केंद्रावरही गार्सेटी यांची मुलगी माया अनेकदा दिसली आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून शपथ विधी घेतली तेव्हा त्यांची मुलगी बायबल हातात घेऊन आलेली साऱ्यांनी बघितली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या