Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकपंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावात रोजगाराच्या 'इतक्या' संधी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावात रोजगाराच्या ‘इतक्या’ संधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा कौशल्य विकास (District Skill Development), रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (Employment and Entrepreneurship Guidance Centre), मानदंड सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ आणि गोखले एज्युकेशन सोसायटी (Gokhale Education Society), यांचे संयुक्त विद्यमाने

- Advertisement -

बुधवारी (दि.7) सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एच. सपट इंजिनिअरींग कॉलेज, कॉलेज रोड, या ठिकाणी बेरोजगार उमेदवारांकरीता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावाचे (Pandit Deendayal Upadhyay Employment Fair) आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बेराजगार उमेदवारांना रोजगार (Employment) व स्वयंरोजगार उपलब्धीसाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यात बॉश, महिंद्रा अँड महिंद्रा, ईएसडीएस सॉफ्टवेअर, डाटा मॅटिक्स, महिंद्रा सोना लि., रेसेमोसा एनर्जी इंडिया, डब्ल्युएनएस, व्हिआयपी ईंडस्ट्रिज, जनरल मिल्स ईंडीया,

सम्राट ग्रुप, बि.व्हि.जी. ईंडीया, अपोलो होम हेल्थकेअर, कॅटाफार्मा केमिकल्स, जस्ट डायल इ. एकूण 31 नामांकित कंपन्या व नियोक्ते 2000 हजार पेक्षा जास्त पदांकरिता रविवारी (दि.7 ) गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एच. सपट इंजिनिअरींग कॉलेज, नाशिक (nashik) येथे उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

सदर मेळाव्यात पाचवी ते बारावी, तसेच कोणत्याही शाखेतील पदवी अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी, पदविका उत्तीर्ण, फार्मसी, आयटीआय, नर्सिंग इ. विविध शैक्षणिक पात्रताधारकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येणार असुन, कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या