Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकअहिंसेचा संदेश देण्यासाठी नाशिकमध्ये ‘जीतो अहिंसा रन’

अहिंसेचा संदेश देण्यासाठी नाशिकमध्ये ‘जीतो अहिंसा रन’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रेम, क्षमा, त्याग ही सर्व अहिंसेचीच (non-violence) रूपे आहेत आणि जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश प्रसारित करण्यासाठी, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनद्वारे (Jain International Trade Organization)

- Advertisement -

आयआयएफएलच्या (IIFL) सहयोगाने देाभरात विक्रमी ‘अहिंसा रन’ (run of violence) चे आयोजन केले आहे. येत्या 2 एप्रिलला ही ‘अहिंसा रन’ घेतली जारार आहे. देाभरातील जितोच्या 68 चॅप्टर आणि 22 आंतरराष्ट्रीय चॅप्टरच्या माध्यमातून एकाच दिवशी सर्व ठिकाणी लाखो अहिंसा प्रेमी नागरीक या रन मध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील मुख्य 11 शहरात या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, 2 एप्रिलरोजी सकाळी 5.30 वाजता अनंत कान्हेरे मैदानावरुन रॅलीला प्रारंभ करण्यात येणार आहे. 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी या तीन टप्पात ‘अहिंसा रन’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जीतो नाशिकचे चेयरपर्सन अँड. सुबोध शहा, सौ. कल्पना पटणी, हर्षित पहाड़े यांनी दिली. अहिंसा रन अनंत कान्हेरे मैदान येथून सुरु होऊन 3 कि.मि. सिबल हॉटेल, 5 कि.मी. एबीबी सर्कल, 10 कि.मी.सातपूर (satpur) अश्या तिन टप्पात स्पर्धा अनंत कान्हेरे मैदानावर समाप्त करण्यात येणार आहे.

अहिंसेचा संदेश देण्यासोबतच ‘स्वच्छ नाशिक, हरित नाशिक’साठी सर्व नाशिककरांनी अहिंसा रनमध्ये (run of violence) सहभागी व्हावे असे आवाहन जीतो नाशिकच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही ’अहिंसा रन’ केवळ एक समुदायापुरती मर्यादित नसून जगभरातून अहिंसेच्या बाजूने असलेल्या लोकांना यात आमंत्रित करण्यात आले आहे. 10 किलोमिटरची रन जिंकणार्‍यां धावपटूंना 11 हजार, 9 हजार, 7 हजार, 5 हजार, 3 हजार, 2 हजार असे पूरस्कार दिले जारार आहेत.

जीतो चॅप्टर, बिज़नेस बे, तिड़के कॉलोनी येथे 23 मार्च पर्यंत नोंदणी करता येणार आहे. जीतो महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा संगीता ललवाणी यांनी सांगितले की यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे नक्कीच ही एक ऐतिहासिक रन ठरणार आहे. त्याचा एक भाग व्हा आणिजगभरात शांतताआणिअहिंसेचा संदेश देण्यासाठी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

जागतीक विक्रम करणार

एकाच वेळी सर्वठिकाणी अहिंसेसाठी रन गेण्याचा हा विक्रम करण्यासाठी देशभरातून 30 हजार लोकांनी शपथ घेणे आपेक्षित आहे. देशभरातील 68 चॅप्टरच्या माद्यमातू लाखो लोक यात सहभागी होऊन याचा नवा किर्तीमान नोंद करतील असा विश्वास राष्ट्रीय सल्लागार सतिष हिरण यांनी सांगितले. यावेळी सामुदायक अहिसेची शपथही दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या