Saturday, April 27, 2024
HomeUncategorized...म्हणून रिलायन्सच्या बहुप्रतीक्षित फोनवर आले विघ्न

…म्हणून रिलायन्सच्या बहुप्रतीक्षित फोनवर आले विघ्न

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

रिलायन्स जिओने (Reliance Jio) गुगलसह (Google) भागीदारी करून तयार केलेला ‘जिओफोन नेक्स्ट’ (JioPhone Next) स्मार्टफोन आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लॉन्च करणार होते. रिलायन्सच्या सर्वसाधरण सभेत ही घोषणा चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली होती.

- Advertisement -

परंतु आता या फोनच्या लॉन्चची तारीख काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. जिओकडून प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

JioPhone Next? काय आहेत याचे फिचर्स

या स्मार्टफोनची ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. प्रायोगिक तत्त्वावर या स्मार्टफोनचा वापर सुरु करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सेमिकंडक्टरचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने या स्मार्टफोनचे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. आता या स्मार्टफोनचे लॉन्चिंग दिवाळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

JioPhone Next चे फीचर्स

  • JioPhone Next अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनवर काम करतो, हे व्हर्जन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे विशेषतः भारतासाठी विकसित केले आहे.

  • व्हॉईस असिस्टंट, भाषा अनुवाद, स्क्रीन टेक्स्टचा स्वयंचलित रीड-अलाऊड आणि यात ऑगमेंटेड रिॲलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा

  • 3,499 रुपयांच्या अंदाजे किंमतीसह लाँच केला शकतो. पण रिलायन्स जिओ या फोनची किंमत कमी करण्यासाठी अधिक ऑफर देऊ शकते.

  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरसह लॉन्च होण्याची शक्यता आहे जे 4 जी नेटवर्कला सपोर्ट करते.

  • 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंट असे दोन पर्याय.

  • इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये, जिओ 16GB व्हेरिएंट आणि 32GB व्हेरिएंट लॉन्च करू शकते.

  • HD रिझोल्यूशनसह 5.5 इंच डिस्प्ले

- Advertisment -

ताज्या बातम्या