Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशशेतकरी आक्रमक! उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅडची जागा खोदली

शेतकरी आक्रमक! उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅडची जागा खोदली

दिल्ली l Delhi

केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज २८ वा दिवस आहे. या आंदोलनाला मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळे सरकार आणि भाजप हैराण झालं आहे. असं असलं तरी कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत, या निर्णयावर सरकार अद्याप ठाम आहे. तर दुसरीकडे,

- Advertisement -

कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतलीय. त्याचाच प्रत्यय आज हरियाणाच्या जींद जिल्ह्यात पाहायला मिळाला. शेतकऱ्यांनी जींदच्या उचाना भागात उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या हॅलिपॅडच्या जागा फावड्याने खोदली.

हरयाणाच्या जींद जिल्ह्याच्या उचाना भागात शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या आगमनासाठी बनवण्यात आलेल्या हेलिपॅडची जागाच खोदून काढलीय. या दरम्यान जननायक जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्याविरोधात नारे लगावताना ‘दुष्यंत चौटाला गो बॅक’ अशा घोषणाही करण्यात आल्या. गुरुवारी दुष्यंत चौटाला यांचं हेलिकॉप्टर या हेलिपॅडवर उतरणार होते. परंतु, शेतकऱ्यांचा विरोध पाहता चौटाला यांना आपला हा दौराच रद्द करावा लागलाय. जेव्हापर्यंत दुष्यंत चौटाला शेतकऱ्यांचं समर्थन करत नाहीत तेव्हापर्यंत त्यांना या परिसरात येऊ न देण्याची भूमिका स्थानिकांनी घेतलीय. सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्या दुष्यंत चौटाला यांनी शेतकऱ्यांसाठी राजीनामा देऊन शेतकऱ्यांचं समर्थन करावं. इथे जो नेता येईल त्याचा अशाच पद्धतीनं विरोध केला जाईल, असंही स्थानिकांनी म्हटलंय.

- Advertisment -

ताज्या बातम्या