Friday, April 26, 2024
Homeनगरघरातून तीन तोळे लंपास

घरातून तीन तोळे लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उन्हाळ्याच्या दिवसात घर उघडे ठेऊन झोपणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. उघडे असलेल्या घरातून चोरट्यांनी आत प्रवेश करून तीन तोळ्याचे गंठण, दोन मोबाईल असा 35 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. अहमदनगर शहरातील आगरकर मळ्यातील बेलेश्वर कॉलनीमध्ये ही घटना घडली.

- Advertisement -

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत अशोक दराडे (वय 19 रा. आगरकर मळा) यांनी फिर्याद दिली आहे. 7 मे, 2022 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी 10 मे रोजी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दराडे कुटुंब घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी आत प्रवेश करून दोन मोबाईल व तीन तोळ्याचे गंठण चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस नाईक गणेश धोत्रे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या