वर्‍हाडाच्या बॅगमधून दागिने लंपास

jalgaon-digital
1 Min Read

नाशिकरोड । Nashik Road (प्रतिनिधी)

जेलरोड येथील एका मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी आलेल्या एका वर्‍हाडीच्या बॅगमधून सुमारे 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संबंधितानी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी केदार खरे रा. सिद्धी विनायक चाळ, टिटवाळा, कल्याण हे आपल्या कुटुंबीयांसह जेलरोड येथील भगवती लॉन्समध्ये लग्नसमारंभासाठी आले होते. खरे कुटुंबीय लग्नसमारंभात व्यस्त असताना अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून बॅगमधील 21 हजार रुपये किमतीचे कर्णफुले, पंधरा हजार रुपये किमतीचे कानातील बेल, 24 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन असा सुमारे 60 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान ही घटना खरे यांना समजताच त्यांनी चोरी गेलेल्या सोन्याचे शोध घेतला. परंतु त्यांना दागिने मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले व अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *