Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रबागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईत होत आहे. बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस, मनसेसह अनेकांनी विरोध दर्शवला होता. तर, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून एक आव्हानही देण्यात आलं होतं. त्यानंतरही, मुंबईतील मीरारोड परिसरात त्यांचा दरबार भरवण्यात आला.

- Advertisement -

मात्र, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबारावेळी चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान कार्यक्रमात सहभागी महिलांचे लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहीती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ३६ महिलांनी मंगळसूत्र आणि सोन्याची चेन चोरी झाल्याची तक्रार दिली आहे.

भीषण अपघात! भरधाव कार ट्रकला धडकली, तिघे जागीच ठार

महिलांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ४ लाख ८७ हजार रुपये किमतीचे त्यांचे दागिने चोरीला गेले आहेत. या महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मीरा रोड येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दोन दिवस प्रवचनाचा कार्यक्रम आहे. काल हा कार्यक्रम पार पडला. आज प्रवचनाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे या दिव्य दरबाराला आजही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Viral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…

कोण आहे धिरेंद्र शास्त्री आणि का इतके प्रसिद्ध झाले?

गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेशात तांत्रिक आणि कथा सांगणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे आणि 25 वर्षीय शास्त्री हे त्यापैकी एक आहेत. काही वर्षांपूर्वी ते ऑटोरिक्षाचालक होते, असा स्थानिकांचा दावा आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत बागेश्वर धाम हे एक छोटेसे मंदिर होते आणि मुख्यतः शास्त्रींनी केलेल्या चमत्कारांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली, असं सांगण्यात येतं. अलीकडे या गावात रस्ते, भोजनालये, हॉटेल्स अशा अनेक मूलभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.

टोळक्याची तरुणांना जबर मारहाण

शास्त्री हे मुख्यतः त्रासलेल्या लोकांना त्यांच्या निवासस्थानी बोलावण्यासाठी ओळखले जातात, जिथे ते त्यांच्या समस्या सोडवतात आणि त्यांना त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगतात, असा दावा केला जातो. बहुतेक तांत्रिक राज्याच्या आश्रयाने भरभराट करतात आणि शास्त्री वेगळे नाहीत. बुंदेलखंड प्रदेशातील बहुतेक आमदार शास्त्रींना आदर देतात. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे देखील शास्त्रींचे अनुयायी असून त्यांनी देखील धामला भेट दिली आहे.

गोदावरीत चार तरुण बुडाले; एकाचा मृतदेह हाती, तिघांचा शोध सुरु

- Advertisment -

ताज्या बातम्या