Thursday, May 9, 2024
Homeनगरजेऊर पाटोदा सहकारी सोसायटी कोल्हे गटाच्या ताब्यात

जेऊर पाटोदा सहकारी सोसायटी कोल्हे गटाच्या ताब्यात

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यात राजकीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जेऊर पाटोदा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन त्यात कोल्हे गटाचे 11 तर काळे गटाच्या 2 संचालकांचा समावेश आहे.

- Advertisement -

बिनविरोध निवडलेल्या संचालकांमध्ये कोल्हे गटाचे पोपट दामोधर आव्हाड, सोपान विश्वनाथ केकाण, दादासाहेब बाबूराव केकाण, बाळासाहेब देवराम केकाण, सतीश सुभाषराव आव्हाड, राजेंद्र कारभारी केकाण, सुरेश बाबुराव गायकवाड, जिजाबाई किसन गीते, पद्मा विठ्ठल आव्हाड, ज्ञानदेव दत्तात्रय बोरावके, ज्ञानेश्वर काशिनाथ केकाण तर काळे गटाच्या रामदास भिकाजी केकाण व मोतिराम सावळेराम भाबड या दोघांचा समावेश आहे.

माजी सभापती मच्छिंद्र केकाण म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जेऊरपाटोदा सोसायटीस सातत्याने सहकार्य करत शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी सर्व प्रकारच्या योजना राबविण्यास प्राधान्य दिले. संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. सदरची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोहन केकाण, कैलास सानप, रमेश केकाण, सुनील केकाण, सतीश केकाण, चंद्रकांत सानप, नितीन सांगळे आदींनी विशेष प्रयत्न केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ व राजकमल गांगुर्डे यांनी काम पाहिले. सचिव संजय आभाळे यांनी निवडणुकीसाठी सहायक म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवडलेल्या संचालकांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या