Wednesday, April 24, 2024
Homeनगरजेऊर, बहिरवाडी, ससेवाडीच्या नुकसानग्रस्तांना ना. तनपुरेंची रोख मदत

जेऊर, बहिरवाडी, ससेवाडीच्या नुकसानग्रस्तांना ना. तनपुरेंची रोख मदत

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

नगर तालुक्यातील जेऊर, बहिरवाडी, ससेवाडीमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. त्यांना नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते व्यथित झाले. नंतर लगोलग दुसर्‍याच दिवशी त्यांनी जेऊर बाजारपेठेतील दुकानदारांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन बैल पोळ्याच्या सणापूर्वीच भरपावसात बहुतेक सर्व दुकानदारांना स्वतः आर्थिक मदत पोहोच केली. मंत्र्यांनी तातडीने दखल घेतल्याने बाजारपेठेतील व्यापारी सुखावून गेले. मदत पोहोच करून ना. तनपुरे यांनी व्यापार्‍यांच्या जखमेवर मदतीची फुंकर घातली.

- Advertisement -

यावेळी गोविंद मोकाटे, सरपंच मगर, माजी सरपंच, इमामपूर सरपंच मोकाटे, झिनेसर, रोहिदास कर्डिले, मगर सर, ससेवाडीचे सरपंच, धनगरवाडी सरपंच, विलासराव काळे, ग्रामपंचायत सदस्य, तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सुमारे 61 दुकानदारांना दुकानात जाऊन मदत पोहोच करण्यात आली आहे.

राहुरी मतदारसंघातील जेऊर तालुका नगर येथील गावच्या बाजारपेठेतील दुकानांचे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झाले होते.त्यामध्ये अनेक व्यावसायिकांचे दुकानातील सामान तसेच काही टपर्‍या व दुकानांमध्ये पुराचे पाणी गेल्याने आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त झालेल्या व्यावसायिकांना बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट संबंधित दुकानदारांच्या दुकानावर आर्थिक मदतीचा हात दिला. यामध्ये काही घरांचे नुकसान झाले होते. या घर मालकांनाही मंत्री तनपुरे यांनी आर्थिक मदत दिल्याने जेऊर गावातील व्यावसायिक व नुकसानग्रस्त जनतेच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे नेहमी मदतीच्या बाबतीत चर्चेत असतात. तसेच ते गोरगरिबांच्या व्यथा जाणून असल्याने त्यांनी त्वरित आपल्या सहकार्‍यांमार्फत ही मदत घरपोहच केल्याने जेऊर गावात एकच चर्चा झाली. पोळा सणाच्या आदल्या दिवशी अचानक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रघुनाथ झिने, जिल्हा परिषद सदस्य गोविंदराव मोकाटे, रोहिदास कर्डिले, जेऊरचे सरपंच तसेच इतर काही कार्यकर्ते प्रत्यक्षात जेऊर गावात हजर होऊन त्यांच्या हस्ते संबंधित आर्थिक मदतीची रक्कम वाटप करण्यात आली. यावेळी सणाच्या तोंडावर मंत्री तनपुरे यांनी आर्थिक मदत दिल्याने सर्वसामान्य जनतेच्या चेहर्‍यावर समाधानाचे हसू दिसून आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या