Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशJet Airways : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक; नेमकं...

Jet Airways : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक; नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली | New Delhi

कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal ED Arrested) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. गोयल यांची गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात चौकशी केली जात होती. त्यानंतर आता गोयल यांना याच प्रकरणात मुंबई कार्यालयात दिवसभर झालेल्या चौकशीनंतर रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे….

- Advertisement -

Maratha Andolan : शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेणार जालन्यातील मराठा आंदोलकांची भेट

गोयल यांच्यावर कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. नरेश गोयल यांनी जेट एअरवेजसारखी मोठी विमान कंपनी स्थापन करून तिला वेगळ्या उंचीवर नेले होते. मात्र, आता ईडीने अटक केल्यानंतर पुन्हा ते जमिनीवर आले आहेत. जवळपास २५ वर्षानंतर जेट एअरवेज एप्रिल २०१९ मध्ये मोठ्या कर्जामुळे बंद झाली होती. त्यानंतर कंपनीचे मालक नरेश गोयल यांच्यावर विदेशी कंपन्यांमध्ये पैसे गुंतविल्याचा आणि अनेक देशांमध्ये चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कॅनरा बँकेशी संबंधित ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

Video : नाशकात मराठा समाजाकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

दरम्यान, नरेश गोयल यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा सीबीआयने ३ मे रोजी दाखल केलेल्या खटल्याच्या आधारावर करण्यात आला आहे. नरेश गोयल यांना आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यासह अनेकजण कॅनरा बँक फसवणूक प्रकरणात आरोपी आहेत. जेट एअरवेज ही एकेकाळी भारतातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपन्यांपैकी एक होती. मात्र २०१९ मध्ये जेट एअरवेजने नगदी संकटाचा हवाला देत त्यांचे ऑपरेशन्स स्थगित केले होते.

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; ‘अशी’ असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

नेमकं प्रकरण काय?

कॅनरा बँकेचे कर्जवसुली व कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी २३ नोव्हेंबर २०२२ ला सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यात आरोपींनी फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले होते.

तसेच कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले. याबाबत बँकेकडून पडताळणी करण्यात आली असता बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चंद्रानंतर आता ‘इस्रो’चा ‘सूर्य नमस्कार’! ‘आदित्य एल१’चं आज प्रक्षेपण; नेमकं काय साध्य होणार? जाणून घ्या सविस्तर

- Advertisment -

ताज्या बातम्या