ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने On behalf of the Marathi Language Department of the State Government दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य Remarkable work in the field of literature करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने Jeevan Gaurav Award सन्मानित करण्यात येते. यावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे Senior Literary Bharat Sasane यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या बुधवारी पुरस्कारांची घोषणा केली.

श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला असून दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला. यावेळी यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *