Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशजेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली –

आयआयटीमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी

- Advertisement -

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात जेईई मेन्स वर्षभरामध्ये चार सत्रात घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ही माहिती दिली. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रवारीमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर 4 ते 5 दिवसात निकाल जाहीर होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला असून विविध प्रवेश परीक्षांचाही खोळंबा झाला होता. मात्र, नव्या वर्षात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जेईई मेन्स परीक्षेसाठी वेळापत्रक निश्चित केलं आहे. जेईई मेन्स परीक्षा पुढच्या वर्षी चार टप्प्यात (सत्रात) घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्यानं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पहिलं सत्र 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल लगेच जाहीर केला जाणार आहे. परीक्षेच्या अखेरच्या तारखेनंतर चार ते पाच दिवसांत निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचं रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या