Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशजेईई मेन परीक्षा पुढे ढकलली

जेईई मेन परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली –

करोना संकटामुळे जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची घोषणा केली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

- Advertisement -

त्यानंतर आता जेईई मेनची परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रवारी आणि मार्चमध्ये पहिले दोन सत्रातील परीक्षा पूर्ण झालेल्या असून, एप्रिलच्या सत्रात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 27, 28 आणि 30 एप्रिलला ही परीक्षा होणार होती. परीक्षेसाठी सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या 15 दिवस आधी ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे शनल टेस्टिंग एजन्सीने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या