Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजेईई अ‍ॅडव्हान्स्डची घोषणा 7 जानेवारीला

जेईई अ‍ॅडव्हान्स्डची घोषणा 7 जानेवारीला

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी प्रवेश परीक्षा म्हणजेच जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2021 अ‍ॅडव्हान्स्ड) च्या तारखेची घोषणा येत्या 7 जानेवारी रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल करणार आहेत.

- Advertisement -

आयआयटी प्रवेशांसाठी आवश्यक पात्रता यंदा काय असणार आहे, याबाबतची घोषणा देखील पोखरियाल करणार आहेत. शिक्षणमंत्र्यांनीच स्वत: ट्विटरवर ही माहिती दिली आहे. 7 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता शिक्षणमंत्री घोषणा करतील. दरम्यान, जेईई मेनच्या तारखेची घोषणा यापूर्वीच पोखरियाल यांनी केली आहे.

जेईई मेन परीक्षा यंदा चार वेळा होणार आहे. पहिल्या टप्प्यात 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान परीक्षा होईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत 16 जानेवारी 2021 आहे. आयआयटींमधील प्रवेशासाठी पात्रतेचे निकष आणि जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेच्या तारखेची घोषणा 7 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता करणार असून EducationMinisterGoesLive हा कार्यक्रम होणार आहे.

तर यंदा जेईई मेन 2021 मध्ये अनेक बदल करण्यात आले असून बी.ई. आणि बी.टेक. साठी होणारी जेईई मेन परीक्षा यंदा चार वेळा होणार आहे. म्हणजे एकदा परीक्षा हुकली तरी विद्यार्थ्यांनी ती देण्यासाठी अन्य तीन संधी मिळणार आहेत. विद्यार्थी एकापेक्षा अधिक वेळा ही परीक्षा देऊ शकतात. त्यांचा बेस्ट स्कोर ग्राह्य धरला जाणार आहे.

थेट अ‍ॅडव्हान्स्डला बसण्याची मुभा

करोना महामारी काळात ज्या विद्यार्थ्यांना जेईई मेन 2020 परीक्षा पात्र होऊनही जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षा देता आली नव्हती, त्यांच्यासाठी यंदा जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेला थेट बसण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना यंदा पुन्हा जेईई मेन परीक्षा द्यावी लागणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या