Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशJEE Advanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर

JEE Advanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर

दिल्ली | Delhi

अखेर JEE Advanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEE Advanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

- Advertisement -

JEE Advanced 2021 परीक्षा ३ जुलै रोजी होणार असून ही परीक्षा आयआयटी खरगपूरतर्फे घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्र्यानी दिली आहे. या परीक्षेसाठी लागणारी 75 टक्केची अट रद्द कऱण्यात आल आहे. केंद्र सरकारनं JEE Main 2020 परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेल्या पण करोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना JEEAdvanced2021 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे.

रमेश पोखरियाल निशंक यांनी यावर्षीच्या JEEAdvanced2021 परीक्षेची तारीख जाहीर करताना मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. JEE Main 2020मध्ये JEE Advanced 2020 परीक्षेला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना यंदाची JEE Advanced 2021 परीक्षा देता येईल. दरम्यान रमेश पोखरियाल निशंक यांनी यापूर्वी जेईई मेन 2021 परीक्षा चार सत्रात होणार असल्याचं जाहीर केलं होते. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रुवारी मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या