Friday, April 26, 2024
Homeनगरजेसीबीने पाडले बीएसएनएल कार्यालय

जेसीबीने पाडले बीएसएनएल कार्यालय

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

दोघांनी केडगाव (Kedgav) येथील नगर-पुणे रस्त्यावरील (Nagar-Pune Road) अंबिकानगर बसस्थानकाजवळ (Ambikanagar Bus Stop) असलेले बीएसएनएलचे कार्यालय (BSNL Office) जेसीबीच्या (JCB) सहाय्याने पाडून टाकले. शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी शनिवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत बीएसएनएलचे (BSNL) उपमंडल अभियंता कमलेश हरी वैकर यांनी फिर्याद दिली आहे. संजय शिवाजी निमसे व सोमनाथ छबुराव रासकर (पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री संजय निमसे व चालक सोमनाथ रासकर हे जेसीबीच्या (JCB) सहय्याने बीएसएनएलचे कार्यालय पाडत होते. ही बाब निदर्शनाला आल्यानंतर याची माहिती कोतवाली पोलिसांना (Kotwali Police) देण्यात आली. पोलीस निरीक्षक संपत शिंदे (PI Sampat Shinde) यांनी पथकासह घटनास्थळी जात निमसे व रासकर यांच्यासह जेसीबी ताब्यात घेतला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बीएसएनएलचे उपमंडल अभियंता वैकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार आर. ए. जाधव अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या