जयप्रकाश दांडेगावकर यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

jalgaon-digital
4 Min Read

नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

सहकार क्षेत्रातील अग्रणी व महाराष्ट्राचे माजी सहकार व वस्त्रोद्योग मंत्री व राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे विद्यमान अध्यक्ष

जयप्रकाश रावसाहेब साळुंके-दांडेगावकर यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ,नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

नवी दिल्ली येथे दि.18 डिसेंबर रोजी झालेल्या महासंघाच्या संचालक मंडळाच्या 214 व्या शिखर बैठकीत एकमताने एक मताने ही निवड करण्यात आली.

श्री दांडेगावकर यांच्यापूर्वी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते.परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

श्री.दांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबांधित असून सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशन , मुंबई , याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या शिवाय ते हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही आहेत.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रात सुधार (रिफॊर्म) होण्याचा जोरदार पाठपुरावा केला आहे. सहकार व साखर क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना श्री. दांडेगावकर म्हणाले ,“साखर कारखाना महासंघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी संचालक मंडळाने माझ्यावर टाकली , विश्वास दाखविला याबद्दल मी संचालक मंडळाचा आभारी आहे, ही निश्चितपणे एक मोठी जबाबदारी आहे.

सहकारी साखर क्षेत्राचा आवाज आपल्या सर्वांच्या सहकार्याने, प्रभावीपणे उठविण्यात येईल. या क्षेत्राशी संबधीत प्रश्न ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, रास्त दर, उसाची थकबाकी, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत, कारखान्यांना मिळणारा वित्तीय पुरवठा, त्यातील व्यावहारिक अडचणी, साखरेची निर्यात याबाबतच्या प्रश्नांचा केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करू.

सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढावी , त्यांचा आर्थिक व वाणिज्यविषयक कारभार अधिक चोख व्हावा यासाठी आपण संचालक मंडळाच्या साह्याने प्रयत्न करू“ अशी ग्वाहीही श्री दांडेगावकर यांनी दिली.

यावेळी बोलताना महाराष्ट्राचे कामगार मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे मावळते अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी श्री. दांडेगावकर यांच्या निवडीचे स्वागत केले. श्री.दांडेगावकर हे अनुभवी नेते व कुशल प्रशासक आहेत, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे पुढील वाटचाल करेल , त्यांच्या सोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळेल या शब्दात श्री वळसे पाटील यांनी आपला विश्वास व्यक्त केला व श्री दांडेगावकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल यांनी या प्रसंगी बोलताना साखर उद्योग कसा अडचणीतून जात आहे याकडे लक्ष वेधले व साखर कारखाना महासंघ या क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावेल असे सांगितले. या वाटचालीत श्री दांडेगावकर यांचे नेतृत्व महासंघाला निश्चितपणे पुढे नेईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक श्री प्रकाश नाईकनवरे म्हणाले श्री दांडेगावकर हे जाणते नेते व कुशल प्रशासक आहेत . त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हा बहुमानच आहे . त्यांच्या नेतृत्वाखाली महासंघ नवे विक्रम स्थापित करतील.

त्यानंतर श्री दांडेगावकर यांनी महासंघाचे अधिकारी व सहकार्‍यांशी चर्चा केली . कोरोना महामारीच्या काळात , लोकडाऊन मध्ये त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करून ते म्हणाले राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ त्यांच्या सदस्य सहकारी साखर कारखान्यांचा एक प्रकारे पालक म्हणून काम करतो आणि त्याची हे भूमिका पुढे कायम राहील श्री दांडेगावकर यांनी महासंघाच्या टेकनो -कमर्शियल सेवेचा आढावा घेतला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *