Thursday, April 25, 2024
Homeनगरजायकवाडी 65 टक्यांच्या पुढे !

जायकवाडी 65 टक्यांच्या पुढे !

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल सोमवारी दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी तसेच भावली, भाम या धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. दिवसभरातील या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक होणार आहे.

- Advertisement -

गंगापूरच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. असे असले तरी गंगापूर धरण 82 टक्क्यांपर्यंत पोहचणार आहे! दारणातून काल सकाळी 6 वाजता 11550 क्युसेकने विसर्ग सुरू होता. तर खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 14234 क्युसेकने विसर्ग सुरु होता. दरम्यान जायकवाडीचा उपयुक्तसाठा काल सायंकाळी 6 वाजता 65.95 टक्के इतका झाला होता !

काल दिवसभर इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरूच होता. दारणा, भावली, भाम ही धरणे फुल्ल झाली आहेत. या तिनही धरणातून विसर्ग सुरु आहेत. त्यामुळे या तिनही धरणांमधील अतिरिक्त पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पर्यायाने गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने धावत आहे. दरम्यान काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणा च्या भिंतीजवळ 14 मिमी पावसाची नोंद झाली होती. इगतपुरीला 43 तर घोटीला 45 मिमी पावसाची नोंद झाली होती.

भावलीला 54 मिमी पावसाची नोंद झाली. भामला 40 मिमी पावसाची नोंद झाली. भाम मधून 2020 क्युसेक, भावलीतून 290 क्युसेकने विसर्ग या दोन्ही विसर्गासह दारणाच्या पाणलोटातील पावसाने दारणात काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत 746 दलघफू म्हणजेच पाऊण टीएमसी पाणी नव्याने दारणात दाखल झाले होते. यामुळे दारणातून काल सकाळी 6 वाजता 11550 क्युसेकने विसर्ग सुरु होता. हा विसर्ग दुपारी 2 वाजेपर्यंत टिकून होता. तीन वाजता पाण्याची आवक कमी झाल्याने तो 7608 क्युसेकवर आणण्यात आला.

दारणातून येणारे पाणी तसेच नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटातील पावसाचे पाणी अशी आवक होत असल्याने काल सकाळी 6 वाजता या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 11079 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो काहीसा वाढवत 12 वाजता 11152 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर तो 14234 इतका वाढविण्यात आला.

काल उशीरा पर्यंत गोदावरीतील विसर्ग 14234 क्युसेकवर स्थिर होता. काल सकाळी 6 पर्यंत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत आतापर्यंत 1 लाख 13 हजार 145 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. हे पाणी पावणेदहा टीएमसी (9779 दलघफू) इतके आहे.

गंगापूर धरणाच्या समुहात मध्यमस्वरुपाचा ते काहि ठिकाणी जोरदार पाऊस काल सकाळी संपलेल्या 24 तासांत पार पडला. गंगापूरच्या भिंतीजवळ 65, त्र्यंबकला 40, अंबोलीला 50 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर धरणात 225 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. सकाळी सहा वाजता गंगापूर 80.44 टक्के भरले होते.

तर काल दिवसभर 12 तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गंगापूरला 35, त्र्यंबकला 19, अंबोलीला 48 मिमी पावसाची नोंद झाली. नवीन आवक सुरु असल्याने गंगापूर काल सायंकाळी 6 पर्यंत 81.79 टक्के भरले होते. आज मंगळवारी सकाळ पर्यंत हे धरण 83 टक्क्यांपर्यंत पोहचलेले असेल. काल संध्याकाळी 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये 4605 दलघफू पाणीसाठा झाला होता.

अन्य धरणांचे साठे असे – पालखेड 66.02 टक्के, कडवा 92.90 टक्के, मुकणे 59.16 टक्के, भोजापूर 100 टक्के, आळंदी 18.97 टक्के, कश्यपी 40.76 टक्के, वालदेवी 78.85 टक्के, गौतमी गोदावरी 51.58 टक्के, वाकी 50.49 टक्के, भाम 100 टक्के.

जायकवाडीचा उपयुक्त 65.95 टक्के साठा

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्तसाठा 65.95 टक्के इतका झाला होता. आता या धरणात उर्ध्व धरणातुन पाणी सोडण्याची गरज पडणार नसल्याने नगर, नाशिक जिल्हयाला मोठा दिलासा मिळाला आहे. उपयुक्तसाठा 50.57 टीएमसी इतका तर मृतसह एकूण साठा 76.64 टीएमसी इतका झाला होता. काल सहा वाजता या जलाशयात 22757 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. तर गोदावरीतुन वैजापूर तालुक्यातील नागमठाण सरिता मापन केंद्राजवळ काल सायंकाळी 7 वाजता 13520 क्युसेकने पाण्याचा प्रवाह जायकवाडीच्या दिशेने सुरु होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या