Friday, April 26, 2024
Homeनगरजयस्तंभ कार्यक्रमामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

जयस्तंभ कार्यक्रमामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

1 जानेवारी 2023 रोजी पेरणे (ता. हवेली, जि. पुणे) येथे जयस्तंभ कार्यक्रम होणार असून सदर जयस्तंभास अभिवादन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होणार आहे. सदर कार्यक्रम हा अहमदनगर-पुणे महामार्गालगत असून कार्यक्रमाकरिता येणार्‍या नागरिकांमुळे सदर महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगर पुणे महामार्गावरून पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक 31 डिसेंबर, 2022 रात्री 12 ते 2 जानेवारी, 2023 रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविणे आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.

- Advertisement -

अहमदनगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारी वाहतूक तसेच अहमदनगरकडून सरळ पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळविणेबाबत आदेश काढले आहे. अहमदनगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारे वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा-दैव दैठण-धावतगाव-पिंपरी कोळंडर-उक्कडगाव-बेलवंडी-अहमदनगर-दौड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ- मढेवडगाव- काष्टी- दौंड- सोलापूर-पुणे महामार्गामार्गे पुणेकडे वळविण्यात आली आहे.

अहमदनगरकडून सरळ पुणेकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीकरिता कायनेटीक चौक- केडगाव बायपास-अरणगाव बायपास- कोळगाव – लोणी व्यंकनाथ- मढेवडगाव- काष्टी- दौड- सोलापूर- पुणे महामार्ग पुणेकडे वळविण्यात आली आहे. बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यांनी उपरोक्त मार्गाचा अवलंब करावा. प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, जय स्तंभास अभिवादन करणेकामी जाणारे भाविकांची वाहने, अ‍ॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या