Friday, April 26, 2024
Homeनगरजायकवाडी धरण भरण्याचा मार्गावर

जायकवाडी धरण भरण्याचा मार्गावर

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात काल पावसाची संततधार सुरू होती. गंगापूरच्या पाणलोटात काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

- Advertisement -

दारणातून काल सायंकाळी 6 वाजता 4354 विसर्ग सुरू होता. गंगापूर धरणातून 1560 क्युसेकने सुरू आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 6456 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत होता.

तीन चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणांचे विसर्ग घटविण्यात आले होते. दारणाचा विसर्ग 1650 क्युसेकवर आला होता. परवा दिवसभर पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने रात्री उशीरा दारणात नवीन पाणी दाखल होऊ लागले.

7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 6705 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणात 93.89 टक्के पाणीसाठा आहे. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 34, इगतपुरीला 64, घोटी 41 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीच्या परिसरात 82 मिमी पावसाची नोंद झाली.

24 तासात दारणात 217 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. परवा 6 वाजता दारणातून सुरू असलेला 1650 क्युसेक विसर्ग दोन तासांनी 2852 क्युसेक इतका करण्यात आला. काल सकाळी 6 वाजता 4354 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

दारणातून काल सकाळी 6 पर्यंत एकूण 10.9 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. भावलीत 15 दलघफू नवीन पाणी दाखल झाले होते. घाटमाथ्यावरील पाणी दाखल होत आहे. भावलीतून 290 क्युसेकने सांडव्यावरून पडणारा विसर्ग दारणाच्या दिशेने वाहत आहे.

मुकणे 7593 टक्के भरले आहे. कडवा 100 टक्के असून त्यातील विसर्ग 848 क्युसेकने सुरु आहे. वालदेवी धरण 100 टक्के असून त्यातून 813 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

गंगापूर धरण 94.21 टक्के भरलेले आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 5304 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणातून परवा सायंकाळी 264 क्युसेकने विसर्ग सुरु होता. नवीन पाणी दाखल झाल्याने 1560 क्ुयसेकने या धरणातून काल विसर्ग सुरु होता.

धरणांचे विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होणारे विसर्ग कमी झाल्याने या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने होणारा गोदावरीतील विसर्ग 3228 क्युसेकवर आला आहे.

वरील धरणांचे विसर्ग वाढले तर या बंधार्‍यातील विसर्गही वाढू शकतील. 1 जून ते काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीत एकूण 18.5 टीएमसीहुन अधिक विसर्ग करण्यात आला आहे.

खाली जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार 8600 क्युसेक ने विसर्ग दाखल होत होता. हे धरण 87.37 टक्के भरले आहे. उपयुक्तसाठा 66.9 टीएमसी इतका झाला तर मृतसह एकूण पाणीसाठा 93 टीएमसी इतका झाला आहे.

या धरणात 100 टक्के पाणीसाठा होण्यासाठी आता 9 टिएमसी पाण्याची गरज आहे. मात्र उर्ध्व धरणातील विसर्ग वाढु लागले तर हे धरण 90 टक्क्यांवर गेल्यावरही त्यातून विसर्ग सोडला जाऊ शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या