Friday, April 26, 2024
Homeनाशिकठेंगोडा येथील जवान रामकृष्ण बागुल यांचे निधन

ठेंगोडा येथील जवान रामकृष्ण बागुल यांचे निधन

लोहोणेर l Lohoner (प्रतिनिधी) :

बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील रहिवाशी रामकृष्ण भिंबा बागुल (वय ४७) हे राष्ट्रीय सुरक्षा कोर DSC-121 PL या तुकडीत हवालदार पदावर सेवेत असलेले व सध्या इंडियन नौवल स्टेशन INS शिवाजी लोणावळा जि. पुणे येथे कार्यरत होते.

- Advertisement -

त्यांच्यावर पुणे येथील कमांडो हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचार सुरु असतांना (दि. ६) रोजी राञी १०.३० वाजता त्यांचे निधन झाले. जवान कै. रामकृष्ण बागुल यांनी भारतीय सैन्य दलात पॅरा फोर्स मध्ये ९ वर्ष सेवा देवुन हवालदार पदावरून २००० मध्ये सेवानिवृत्त झाले.

त्यानंतर ते २००१ पासुन राष्ट्रीय सुरक्षा कोर या सुरक्षा विभागात हवालदार म्हणुन नोकरीत सेवा देत होते. त्यांनी आपल्या वयाची जवळपास २९ वर्ष सेवा ही देशसेवेसाठी सुरक्षा सेवेत दिली. पुणे येथे त्यांच्या तुकडी कडुन त्यांना शेवटची मानवंदना देण्यात आली. त्यांचा अंत्यसंस्कार उद्या सकाळी आठ वाजता ठेंगोडा येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या