Wednesday, April 24, 2024
Homeनगरजळके बुद्रुक येथे सोयाबीन पीक पाहणी

जळके बुद्रुक येथे सोयाबीन पीक पाहणी

देवगडफाटा |वार्ताहर|Devgadphata

नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक येथे देवगड फाटा येथील लोखंडे यांच्या शेतात सोयाबीन पीकपाहणी कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच कैलास झगरे होते.

- Advertisement -

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी शास्त्रज्ञ अशोकराव ढगे, उपसरपंच नितीन दहातोंडे, पत्रकार इकबाल शेख, सुभाष दिघे, कृषी अधिकारी श्रीमती झिने, बियाणे कंपनीचे अधिकारी विजय पवार, अमोल देशमुख होते. विजय पवार यांनी स्वागत केले तसेच सोयाबीनच्या अधिक उत्पादनक्षम जातीच्या बियाणाची माहिती दिली.प्रगतिशील शेतकरी धनंजय लोखंडे व संजय लोखंडे यांनी उत्तम पीक घेतल्याबद्दल त्यांचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. ढगे यांनी कौतुक केले.

याप्रसंगी माजी सरपंच गिननदेव लोखंडे, रावसाहेब मोटे, अशोक रूपनर, सुखदेव लोखंडे, लतीब शेख, सलीम शेख, जगन्नाथ नरोडे, शरद पागिरे, कैलास ढोकणे, दत्तात्रय लोखंडे, रामदास नवसे, कैलास लोखंडे, भाऊराव लोखंडे, नवनाथ शिंदे, बाळू थोरात, सांडू शेख,नंदू दहातोंडे, सुनील झगरे, लक्ष्मण राऊत, जालिंदर झगरे, अब्दुल्ला शेख, मन्सूर शेख, चंगदेव थोरात, राजू गोरे, जनार्धन झगरे, शहानूर पटेल, भिमराज पागिरे, नंदू ससे, विठ्ठल आखाडे, चांगदेव राजगुरू, संतोष कुरे आदी उपस्थित होते आभार अमोल देशमुख यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या