Friday, April 26, 2024
Homeनगर'त्या' शाळकरी मुलावर जिवघेणा हल्ला करणारी बिबट्या मादी अखेर जेरबंद

‘त्या’ शाळकरी मुलावर जिवघेणा हल्ला करणारी बिबट्या मादी अखेर जेरबंद

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

राहुरी तालुक्यातील जातप परिसररात राहणार्‍या मयूर बोबंले या शालेय विद्यार्थ्यावर जिवघेणा हल्ला करणारी बिबट्या मादी जेरबंद करण्यास वनविभाला काल दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास यश आले. बिबट्या मादी जेरबंद झाल्याने येथील ग्रामस्थांसह वनविभागाने सुटकेचा नि:स्वास सोडला आहे.

- Advertisement -

रविवार दि.16 आँक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शालेय विद्यार्थी मयूर बोंबले हा शेतात घास कापत असतांना मादी बिबट्याने जिवघेणा हल्ला केला होता. दैव बलवत्तर म्हणून या घटनेतून त्याचा जिव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच सकाळीच राहुरी येथिल वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे सोबत दोन पिंजरे व वनविभागाचे पथक घेऊन घटनास्थळी जातप शिवारात दाखल झाले. पावसामुळे सर्वत्र चिखल झाला असल्याने घटनेचे गांभिर्य ओळखून त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांनी चिखल तुडवत परिसर पिंजून काढला व जेथे ठसे आढळून आले त्या ठिकाणी दोन पिंजरे लावले. व दिवसभर बिबट्या जेरबंद होण्याची वाट पाहात ठाण मांडून होते.

सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या मादी एका पिंजर्‍यात जेरबंद झाली. मादी जेरबंद झाल्याची बातमी परिसरात वार्‍या सारखी पसरली व मादीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गंभीर जखमी झालेल्या मयूर बोंबले याचा भाऊ व आजोबा यांनी हल्लेखोर मादीला ओळखले व सकाळी हिच होती असे सांगितल्याने नागरिकांसह वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सुटकेचा निस्वास सोडला. वनविभागाने तातडीने मादी जेरबंद केल्या बद्द्लनागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.

जेरबंद केलेली मादी तातडीने जंगलात सोडून देण्यात आली आहे. मादी जेरबंद झाली असली तरी तिचे बछडे अद्याप मोकळेच आहे. ते लहान असल्याने ते ही लवकरच जेरबंद होईल. तरी देखील रात्री अपरात्री घराबाहेर पडतांना ग्रामस्थांनी सावधानता पाळण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या