Wednesday, April 24, 2024
Homeनगरजरे हत्याकांड : तिघांना 2 दिवस पोलीस कोठडी

जरे हत्याकांड : तिघांना 2 दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर/पारनेर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेखा जरे हत्याकांडात अटक असलेल्या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते.

- Advertisement -

आरोपी सागर भिंगारदिवे, ॠषीकेश पवार, आदित्य चोळके यांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने सर्व आरोपींना तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले होते. जरे यांचा अपघात घडवून आणण्यात येणार होता, त्यातील आरोपी तसेच त्या घटनेत वापरण्यात येणारा टेम्पो हस्तगत करायचा आहे. जरे हत्येप्रकरणातील सुत्रधार बाळ बोठे याने हत्या करण्यासाठी दिलेल्या सुपारीची उर्वरित रक्कम हस्तगत करायची आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना अजूनही साथीदार असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची विचापूस करणे आवश्यक आहे. विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले असून त्याअनुषंगाने सखोल चौकशी करायची असल्याने पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी तर तिघांना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयास केली.

न्यायालयाने पाटील यांनी विनंती मान्य करून राजू शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांना न्यायालयीन तर सागर भिंगारदिवे, ॠषीकेश पवार आणि आदित्य चोळके यांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बोठेचा अटकपूर्वसाठी अर्ज दाखल

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार बोठे हा सध्या फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला असून या अर्जावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. जरे यांची हत्या झाल्यापासून बोठे फरार आहे. पोलीसांनी आरोपींच्या यादीत त्याचे नाव घेतल्यानंतर त्याने अटकपूर्वसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार काल अ‍ॅड. महेश तवले यांच्यामार्फत बोठे याने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने उशीरा हा अर्ज दाखल करून घेतला असून त्यावर आज सुनावणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या