Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही

अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही

पुणे |प्रतिनिधी| Pune

जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) घेतला तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. त्यांनी कारखान्याचा स्वतः लिलाव (Auction) केला आणि स्वतः घेतला. राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारचा पैसा जातो आणि त्याला अर्थमंत्रायल मान्यता देते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी सर्व उल्लंघन केले. असून त्यांना उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) पदावर राहता येणार नाही. अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या (Criticism BJP leader Kirit Somaiya) यांनी केली. यश -व्ही – जेवेल्स या शेल कंपनीच्या माध्यमातून अजित पवार (Ajit Pawar)यांनी मोठ्या प्रमाणात मनी लँडरिंग केले आहे असा आरोपही त्यांनी केला. पुण्यामध्ये (Pune) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -

सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, 27 हजार सभासदांचा जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Factory) काढून घेतला. मी तेव्हापासून विचारतोय कारखान्याचा मालक कोण?” “उच्च न्यायालयाने जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Factory) खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. कारखाना खरेदी करताना अजित पवारांनी (Ajit Pawar) सगळ्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आयकर विभागाने (Income Tax Department) कारवाई केली. पण अजित पवारांनी (Ajit Pawar) माझ्या बहिणीच्या घरी धाडी टाकल्या गेल्या, केंद्र सरकार सूडाच्या वृत्तीने राजकारण करतंय, अशी भावूक प्रतिक्रिया दिली. मात्र, जरंडेश्वर (Jarandeshwar Factory) घेतलेल्या कंपनीत एक संचालक विजया पाटील यांचे पती मोहन पाटील आहेत. विजया पाटील,मोहन पाटील,नीता हे अजित पवार यांच्या कंपनीत पार्टनर आहेत. शरद पवार (Sharad Pawar), रोहित पवार (Rohit Pawar), अजित पवार (Ajit Pawar), पार्थ पवार (Parth Pawar)आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यांनी सांगावं की जरंडेश्वर साखर कारखान्याचा (Jarandeshwar Sugar Factory) जो मालक आहे, मुख्य भागधारक त्यात एक नाव आहे मोहन पाटील ते विजया पाटील यांचे पती आहेत. दुसरे आहेत निता पाटील हे लोक कोण आहेत? आता खरं खोटं काय आहे ते पवारांनी स्पष्ट करावं असेही ते म्हणाले.

बहीणींच्या नावाने अजित पवार यांनी बेनामी मालमत्ता उभी केली आहे. मग त्यात बहीणींचा संबंध नसेल तर त्यांना न सांगता त्यांच्या नावावर बेनामी मालमता केली का? असा सवाल यांनी सोमय्या यांनी उपस्थित केला. अजित पवार व सहकाऱ्यांवर सुरू असलेली आयकर खात्याची धाड गेली सात दिवस सुरू आहे. ही देशातील सर्वात मोठी धाड आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनीच आपल्या पत्नीच्या नावाने 19 बांगल्यां बेनामी संपत्ती अलिबाग येथे केली आहे. जरंडेश्वर साखर कारखानाच्या मूळ मालकापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये 27 नावं येतात. जरंडेश्वरचे 90 टक्के शेअर्स 27 लेअर नंतर शेवटी स्पार्किंग सॉइल या कंपनीकडे आहेत आणि त्याचे मालक सुनेत्रा अजित पवार आणि अजित अनंतराव पवार आहेत. या कंपन्यांच्या गुंतवणुकीत 57 नामी-बेनामी कंपन्या आहेत. यावर नेटफिलक्सने सिरीयल बनवली तर अजित पवारांना कमीत कमी 200 ते 300 कोटी रॉयल्टी मिळू शकते, यातला सिझन 1 हा अजित पवार (Ajit Pawar) असेल” असा टोलाही सोमय्यांनी (Kirit Somaiya) लगावला

शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे महाराष्ट्राचे गुरु, त्यांना गुरू म्हणतात. मंत्र्यांच्या व्यवसायावर प्रतिबंध नाही, मात्र पदाचा फायदा घेऊन स्वतःच्या संस्थांना फायदा पोहोचवत राहणं गैर असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या