26 जानेवारीला नगरमध्ये ‘ट्रॅक्टर तिरंगा रॅली’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून नगरमध्ये प्रजासत्ताकदिनी नगरमध्ये ट्रॅक्टर तिरंगा रॅलीचे आयोजन करणयात आले आहे.

नगरमध्ये झालेल्या शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाच्या बैठकीत 26 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आणि अहमदनगर शहरात सकाळी 11 वाजता एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर तिरंगा रॅलीची सुरूवात होईल.

रॅलीचा मार्ग पुढे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चांदनी चौक, स्टेट बँक चौक, इदगाह मैदान, डीएसपी चौक आणि पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून रॅलीची सांगता होईल.

सदर बैठकीस राज्य कर्मचारी संघटनेचे नेते रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, भा.क.प.चे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, मा.क.प.चे कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, विडीकामगार संघटनेचे अंबादास दौंड, अ.भा.किसानसभेचे अ‍ॅड.कॉ. बन्सी सातपुते, पीस फौंडेशनचे आर्कि.अर्शद शेख, ग्रामपंचायत आणि पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *