Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedJanmashtami 2022 : 'या' कलाकारांना कृष्णाची भूमिका साकारून मिळाली लोकप्रियता

Janmashtami 2022 : ‘या’ कलाकारांना कृष्णाची भूमिका साकारून मिळाली लोकप्रियता

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा मथुरेत जन्म झाला. हा दिवस म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी यंदा १८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी केली जाते.

कृष्ण म्हटलं की त्याच्यासोबत त्याचे सवंगडी आले. गोपिकांना छेडणारा, दह्यादुधाचा काला करणारा हा कृष्ण प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवला तो छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी. पडद्यावर साकारलेल्या या कृष्णाच्या भूमिकेने देखील या कलाकरांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. चला तर मग पाहुयात कोण होते ते कलाकार.

- Advertisement -

सर्वदमन डी बॅनर्जी

रामानंद सागर यांच्या प्रचंड गाजलेल्या ‘कृष्णा’ या मालिकेत सर्वदमन यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती.

नितीश भारद्वाज

बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या कार्यक्रमात नितीश यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती.

सौरभ राज जैन

‘उतरन’, ‘चंद्रगुप्त मौर्य’ यांसारख्या कार्यक्रमात भूमिका करणारा अभिनेता सौरभ राज जैन याने २०१३ साली आलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती.

विशाल करवाल

‘द्वारकाधीश- भगवान श्री कृष्ण’, ‘नागार्जुन- एक योद्धा’ आणि ‘परमावतार श्री कृष्ण’ या मालिकांमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता विशाल करवाल देखील प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता.

सुमेध मुदगलकर

मराठी अभिनेता सुमेध मुदगलकर ‘राधाकृष्ण’ मालिकेत साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकेसाठी प्रचंड लोकप्रिय आहे.

स्वप्नील जोशी

मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने वयाच्या नवव्या वर्षी रामानंद सागर यांच्या ‘कृष्णा’ कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या