Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमनपात सोमवारपासून जनता दरबार

मनपात सोमवारपासून जनता दरबार

नाशिक | Nashik

नाशिक महानगरपालिका सभागृह नेते पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ॲक्शन मोडमध्ये असलेले भाजपचे नगरसेवक कमलेश बोडके आता आठवड्यात चार दिवस जनता दरबार घेणार आहेत.

- Advertisement -

महापालिकेशी संबंधित लहान-मोठी कामे व जनतेच्या प्रश्नांचे निराकरण या माध्यमातून करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

नागरिकांनी रस्ते, पथदिप, घंटागाडी, पाणी पुरवठा, मलनिस्सारण (ड्रेनेज) व्यवस्था, घरपटटी पाणीपटटी, फेरीवाला झोन, अतिक्रमण विभाग, याशिवाय नाशिक महानगरपालिका संदर्भातील सर्व तक्रारीचे निराकरण करण्यासाठी येत्या सोमवार (दि.21) पासून सोमवार ते शुक्रवार दुपारी ३-०० ते ५-३० या वेळेत (शासकिय सुटयांचे दिवस वगळून) दुसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे समक्ष उपस्थित राहून समस्या व तक्रारीसमवेत केलेला प्रत्रव्यवहाराच्या प्रती घेवून उपस्थिती राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ज्या जेष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ती यांना उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांनी नागरीकांनी हेल्प लाईन क्रमांक ०२५३-२२२२५०५ येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या