Thursday, April 25, 2024
Homeनगरलोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरेंचा 14 हेक्टर ऊस जळाला

लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरेंचा 14 हेक्टर ऊस जळाला

लोणी (वार्ताहर) –

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच जनार्दन चंद्रभान घोगरे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावरील

- Advertisement -

चौदा हेक्टर उसाला दुपारच्या वेळी आग लागून उसाचे पीक व त्यातील ठिबक संच असे सुमारे 45 लाखांचे नुकसान झाले.

श्री. घोगरे यांच्या लोणी खुर्द गावातील शेतामध्ये उसाचे पीक उभे होते. हा ऊस लवकरच गाळपासाठी कारखान्याला जाणार होता. मात्र मंगळवार दि. 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ऊस पेटला. जोराचे वारे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. जनार्दन घोगरे यांच्या नावावरील गट नं. 169/2, 3, 4 मधील 6.72 हेक्टर क्षेत्रातील उसाचे पीक व ठिबक संच नुकसान (23.60 लाख),

प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या 169/2, 173/1 मधील 2.80 हेक्टर क्षेत्रातील ऊस पीक व ठिबक संच नुकसान (9.80 लाख), अरुंधती एकनाथ घोगरे यांच्या 169/1 मधील 3.24 हेक्टर क्षेत्रातील ऊस पीक व ठिबक संच नुकसान (11.30 लाख) असे चौदा हेक्टर क्षेत्रातील उसाचे पीक व ठिबक संच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे 44 लाख 70 हजाराचे नुकसान झाल्याचा पंचनामा लोणी खुर्दच्या कामगार तलाठ्यांनी केला आहे. जनार्दन घोगरे हे आदर्श शेतकरी असून ते आधुनिक पद्धतीने शेती पिके घेतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या