Thursday, April 25, 2024
Homeजळगावशिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर – Jamner – प्रतिनिधी :

येथील जामनेर पुरा सरदार वल्लभभाई पटेल नगरमधील रहिवासी

- Advertisement -

शिक्षिका शितल एकनाथ साळुंखे वय 40 या महिलेने आज दुपारी राहते घरांमध्ये गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली .

जामनेर येथील सेवानिवृत्त गटविकास अधिकारी एकनाथ साळुंखे यांची शितल ही मुलगी असून शिरपूर येथे त्यांची सासरवाडी होती.

त्या जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका होत्या.त्यांचे त्यांच्या पतीसोबत वाद होते, पती पासून दोन वर्षांपासून विभक्त होऊन जामनेर येथे वडील एकनाथ साळुंखे यांचे कडेच रहात होती .

शीतल साळुंके ला एक अठरा वर्षाचा मुलगा असून त्या मानसिक तणावाखाली असल्याचे बोलले जात होते. मानसिक ताण तणाव मुळेच त्यांनी जीवन यात्रा संपवली असे वृत्त आहे.

याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज शेख अधिक तपास करीत आहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या