Thursday, April 25, 2024
Homeनगरजामखेडला पाणी पुरवठ्यासाठी 18 कोटींचा निधी - खा. डॉ. विखे

जामखेडला पाणी पुरवठ्यासाठी 18 कोटींचा निधी – खा. डॉ. विखे

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरु केलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील 15 गावांतील पाणी पुरवठा योजनांकरीता 18 कोटी 17 लाख 56 हजार रुपयांचा निधी मंजुर झाला असल्याची माहीती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

- Advertisement -

खा.डॉ.सुजय विखे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नळाव्दारे पाणी मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने जलजिवन मिशन सुरु केले आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांना बळकटी देण्याचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे. प्रतिदिन एका व्यक्तिला 55 लिटर पाणी मिळावे याकरीता प्रत्येक गावात नवीन पाणी पुरवठा योजना सुरु करणे अथवा जुण्या पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती करीता राज्य सरकारच्या हिश्यासह या निधीची उपलब्धता केंद्र सरकारने करुन दिली आहे.

जामखेड तालुक्यातील 15 गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव जलजिवन मिशन अंतर्गत सादर करण्यात आला होता. या सर्व योजनांच्या प्रस्तावास केंद्र शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने निधी उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तालुक्यातील या पाणी योजनांसाठी 18 कोटी 17 लाख 56 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने या लवकर या पाणी योजनांची कामे सुरु होतील असा विश्वास खा. डॉ. विखे यांनी व्यक्त केला.

गावे अशी कंसात निधी

वाकी गाव (1 कोटी 23 लाख), सावरगाव (94 लाख 57 हजार), फक्राबाद (1 कोटी 30 लाख), मोहरी (92 लाख 37 हजार), धनेगाव (81 लाख 3 हजार), नाहुली (80 लाख 75 हजार), सरदवाडी (88 लाख 86 हजार), सोनेगाव (82 लाख 90 हजार), राजुरी (1 कोटी 7 लाख), हसनाबाद (1 कोटी 42 लाख), शिऊर (1 कोटी 97 लाख), मोहा (1 कोटी 67 लाख), जातेगाव (1 कोटी 23 लाख), साकत (1 कोटी 97 लाख), करपडी (1 कोटी 50 लाख) रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या