Thursday, April 25, 2024
Homeनगरजामखेड तालुक्यात पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच

जामखेड तालुक्यात पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड पोलिसांनी खर्ड्यातील जुगार अड्ड्यावर धाड टाकत सहा जुगार्‍यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.

- Advertisement -

या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा भागात जुगार अड्डा सुरू असल्याची बातमी मिळाल्यानंतर जामखेड पोलिसांच्या पथकाने खर्डा गावात 12 रोजी धाड टाकत सहा जुगार्‍यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. या कारवाईत सुमारे 25 हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला गोरख बबन खोबरे, सुरज तेजसिंग भागडे, प्रविण बबन राऊत (सर्व रा. खर्डा), पद्माकर पांडुरंग काळे (धनेगाव),महावीर बबन तादगे (रा दौंडाचीवाडी) बापू भास्कर पवार (रा. अंतरवली भूम) या 6 जणांविरोधात जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या या सहा जुगार्‍यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून देण्यात आले.दरम्यान जामखेड पोलिसांनी अवैध व्यवसायासह जुगार अड्ड्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईच्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, हेड कॉन्स्टेबल नवनाथ भिताडे, शिवाजी भोस, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, संदीप राऊत, आबासाहेब आवारे, अरुण पवार सचिन राठोड यांचा समावेश होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या