Saturday, May 4, 2024
Homeनगरजामखेड नगरपरिषदच्या मुख्याधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश

जामखेड नगरपरिषदच्या मुख्याधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर येथील कर्मचार्‍यांनी आज तहसिलदारांच्या उपस्थितीत लेखनीबंद आंदोलन मागे घेतले.

- Advertisement -

मुख्याधिकारी येथील कर्मचार्‍यांना अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास देत असल्याने कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवार व मंगळवार दोन दिवस नगरपरिषद कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन केले. आज तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पत्र वाचून दाखवले. संघटनेने केलेल्या मागणीनुसार मुख्याधिकार्‍यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात यावी तसेच समितीच्या अहवालानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याचे तहसिलदारांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी डॉ. अरुण जाधव यांनी संघटनेच्या मागण्यांबाबत खुलासा केला कर्मचार्‍यांना होत असलेला त्रास मुख्याधिकार्‍यांकडून मिळत असलेली अपमानास्पद वागणूक तात्काळ बंद व्हावी, समितीच्या चौकशी अंती मुख्याधिकारी यांची बदली झालीच पाहिजे यावर ते ठाम राहिले. यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपली भूमिका मांडून या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित बापूसाहेब ओहोळ, अतिश पारवे, योगेश सदाफुले, आजिनाथ शिंदे, पांडुरंग भोसले, अ‍ॅड .प्रवीण सानप, विशाल पवार, शिवकुमार डोंगरे, राम पवार, बाबासाहेब फुलमाळी, मच्छिंद्र जाधव, योगेश घायतडक, सतीश डिसले, राजेंद्र गायकवाड, प्रमोद टेकाळे, लक्ष्मण माने, सय्यद वलीमहंमद, अतुल राळेभात, आकाश सानप, संजय खेत्रे, संतोष खंडाळे, वैजीनाथ केसकर, संतोष चव्हाण, राजू शिंदे, अतुल ढोणे, अंकुश पवार, द्वारका ताई पवार उपस्थित होते.तहसीलदारांच्या चौकशीच्या लेखी पत्रानंतर लेखनीबंद आंदोलन थांबवल्याचे संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी जाहीर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या