Wednesday, April 24, 2024
Homeनगरजलयुक्त शिवार योजनेमुळे कर्जतमध्ये जलक्रांती : उपनगराध्यक्ष राऊत

जलयुक्त शिवार योजनेमुळे कर्जतमध्ये जलक्रांती : उपनगराध्यक्ष राऊत

कर्जत |वार्ताहर| Karjat

जलयुक्त शिवार योजनेमुळे कर्जतमध्ये जलक्रांती झाली, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले.

- Advertisement -

शहराजवळील लेंडी नदीस शनिवारी (दि. 10) रात्री झालेल्या पावसामुळे जवळपास चौदा वर्षांनंतर पूर आला. ही नदी दुथडी भरून वाहू लागली. यावरील 26 बंधारे पूर्णपणे भरले गेले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये कर्जत नगरपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला होता. त्याची फलश्रुती झाली. यामुळे नगरपंचायतीच्यावतीने जलपूजन कार्यक्रम करण्यात आला.

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या सरकारने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवली. या योजनेमध्ये नगरपंचायत देखील सहभागी झाली होती. माजी पालकमंत्री राम शिंदे या मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे त्याचा फायदा याठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाला.

लेंडी व कानळा या नदीवर 26 पेक्षा जास्त बंधारे बांधले या नदीचे खोलीकरण, रुंदीकरण केले त्याचा फायदा आज परिसरातील शेतकर्‍यांचे शेतीचे उत्पादन वाढणार असून ज्यांच्या स्वतःच्या कूपनलिका आहेत त्यांचाही देखील पाण्याचा विचार होणार आहे. कर्जत नगरपंचायत योजनेमध्ये अग्रेसर होऊन चांगले काम केल्यामुळे राज्यात तिसरा क्रमांक मिळवला होता. हा कर्जतकर यांचा खरा सन्मान आहे.

नगराध्यक्षा प्रतिभा वहिनी म्हणाल्या की,14 वर्षांनी कर्जतमधील या नदीला पूर आला आहे. सर्व बंधारे भरले गेले आहेत. त्यामुळे कर्जतकरांना आनंद झाला असून आम्ही आनंदामुळे आज याठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन करत आहोत. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगरसेविका उषा राऊत, वृषाली पाटील, हर्षदा काळदाते, सचिन पोटरे, अमृत काळदाते, अक्षय राऊत, मनीषा वडे, रामदास हजारे, महादेव सुरवसे, गोरख भोगे, सतीश समुद्र, वैभव शहा उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या