शेतकरी दाम्पत्यांच्या हस्ते जलपूजन

jalgaon-digital
3 Min Read

मुंजवाड । वार्ताहर Munjwada-Baglan

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) 35 गावांकरिता जीवनदायी ठरलेल्या पश्चिम पट्ट्यातील केळझर धरण (Kelzhar Dam) संततधार पावसाने (Heavy Rain) ओव्हरफ्लो (Overflow) होवून सांडव्यावरून 1 हजार 144 क्युसेस पाण्याचा होत असलेल्या विसर्गामुळे आरम नदी (Aram River) दुथडी खळाळून वाहू लागली आहे. शेती सिंचनासह (Agricultural Irrigation) पिण्याच्या पाण्याचा (drinking water) प्रश्न केळझर तुडूंब भरल्याने निकाली निघाला असल्याने शेतकर्‍यांसह (Farmers) ग्रामस्थ सुखावले आहेत.

दरम्यान, पाणीटंचाईचे संकट (Crisis of water scarcity) दूर करणार्‍या जीवनदायी केळझर धरणाच्या पाण्याचे पुजन बागलाणचे आ.दिलीप बोरसे यांच्यासह कृती समिती पदाधिकारी व पाच शेतकरी जोडप्यांच्या हस्ते विधीवत पुजा करीत जलपूजन (Jalpujan) केले गेले. चारी क्रमांक 8 चे काम प्रगतीपथावर आहे. चारीचे काम पुर्ण होताच या कालव्याला पुरपाणी सोडून चाचणी केली जाणार आहे. सदर चाचणी यशस्वी झाली तर शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचणार आहे.

या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांना निर्देश देण्यात आले असून चारीला पाणी आल्यास शेतकर्‍यांसाठी ते मोठे लाभदायी ठरणार असल्याचे यावेळी आ. दिलीप बोरसे यांनी बोलतांना सांगितले. केळझरपासून ते सटाणा (Satana) आराईपर्यंतच्या परिसरातील गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व शेती सिंचनासाठी जीवनदायी म्हणून केळझर धरण ओळखले जाते.

यंदा पावसाळा सुरू होवून दिड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी पावसाचे प्रमाण कमी (Low rainfall) असल्याने केळझरमध्ये समाधानकारक पाणी साठा होवू शकला नव्हता. कमी पर्जन्यमानामुळे चिंतेचे सावट पसरले असतांना लाडका विघ्नहर्ता आपल्या सोबत वरूणराजास घेवून आल्याने मागच्या आठवड्यात या भागात संततधार तर दोन दिवसापुर्वी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले होते.

पाणलोट क्षेत्रातील संततधारेमुळे केळझर धरण पुर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले होते. 1 हजार 144 क्युसेस पाण्याचा सांडव्यावरून विसर्ग होत असल्याने आराई नदीस देखील पूर आला आहे. केळझरपासून तर आराईपर्यंत 35 गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणार्‍या पाणीपुरवठा योजना आणि शेतकर्‍यांच्या शेतीला लागणारे पाणीपुरवठा करण्यासाठी केळझर महत्वाचा जलस्त्रोत्र ठरला आहे.

धरण शंभर टक्के भरल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकरी सुखावले आहे. तुडूंब भरलेल्या केळझरचे जलपुजन आ. दिलीप बोरसे यांच्यासह पाच शेतकरी जोडप्यांच्या हस्ते विधीवत पुजा करत केले गेले.

यावेळी तहसीलदार जितेंद्र इंगळे, पं.स. गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, पं.स. प्रभारी सभापती ज्योती अहिरे, कृउबा माजी सभापती प्रभाकर रौंदळ, संजय सोनवणे, संचालक पंकज ठाकरे, सोमनाथ सूर्यवंशी, सुधाकर पाटील, सहाय्यक अभियंता ए.बी. रौंदळ, शाखा अभियंता संजय पाटील, केदा काकुळते, राकेश मोरे, दिलीप अहिरे, कडू मोरे, मुन्ना सूर्यवंशी, नितीन बोरसे, अजय तिवारी परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *