Wednesday, April 24, 2024
Homeनगरनिवडणूक निकालानंतर जल्लोष; वांबोरी, गणेगावला गुन्हे दाखल

निवडणूक निकालानंतर जल्लोष; वांबोरी, गणेगावला गुन्हे दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील वांबोरी व गणेगाव येथे ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर गुलाल उधळून फटाके वाजविल्याप्रकरणी समर्थक कार्यकर्त्यांवर

- Advertisement -

राहुरी पोलीस ठाण्यात जिल्हाधिकार्‍यांच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वांबोरीत नऊजणांवर तर गणेगावला 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गणेगाव येथे भाजपने राष्ट्रवादीचा पराभव करीत सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळविला. हा विजय साजरा करण्यासाठी सायंकाळी उमेदवारांची जेसीबीवरून मिरवणूक निघाली. डीजेचा आवाज घुमला. जेसीबीवरून गुलालाची उधळण सुरू झाली. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भानगडे यांच्यासह 19 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.

पोकॉ. सचिन लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.रजि.नं. व कलम -ख 53/2021 भादंवि. कलम 341,143,145,146,147,149,188,189, सह मुंबई पोलीस अ‍ॅक्ट 85प्रमाणे शिवाजी आप्पाजी कोळसे (वय 55 वर्ष, रा. गणेगाव), भगवान महाराज कोबरणे (वय 21 वर्ष), दत्तात्रय बाळासाहेब कोबरणे, महेश बाबासाहेब कोबरणे, सोपान काशिनाथ माळी, आदिनाथ बापू कोबरणे, प्रदीप पोपट कोबरणे, महेश साहेबराव भनगडे, विकास सुरेश कोबरणे, बाबासाहेब काशिनाथ कोबरणे, बाळासाहेब भिकाजी कोबरणे भाऊसाहेब सोन्याबापू कोबरणे, बाबासाहेब ज्ञानदेव कोबरणे, पोपट दामोदर कोबरणे, सतीश माणिकराव कोबरणे, दादा रघुनाथ लहूडे, सोन्याबापू सोपान कोबरणे, अमोल साहेबराव भनगडे, संदीप ज्ञानदेव मोरे या 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर वांबोरी येथेही निवडणुकीचा विजय साजरा करण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणूकप्रकरणी पोहेकॉ. बन्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, तुषार संभाजी मोरे, नवनाथ गवते, किसन जवरे, गोरख देवकर, स्वर कुसमुडे, गोरख ढवळे, प्रशांत नवले (रा. वांबोरी ता. राहुरी) यांच्यावर गु. रजि नं. व कलम भा.दं.वि.कलम 188,143,मुंबई पोलीस कायदा कलम 37(1) 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या