Tuesday, April 23, 2024
Homeनगरजलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रस्तावास प्रशासकीय मान्यता- ना. तनपुरे

जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रस्तावास प्रशासकीय मान्यता- ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील वांबोरी गावासह वाड्या-वस्त्यांवर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली असून सुमारे 40 कोटी 64 लाख रुपये खर्च करण्यास परवानगी मिळाली आहे लवकरच कार्यारंभ आदेश होऊन कामास सुरुवात होणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

- Advertisement -

ना. तनपुरे यांनीसांगितले की, वांबोरी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाड्या-वस्त्यांवर विखुरले आहेत. या सर्वच भागातील जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या गावाचा समावेश करण्यात आला असून त्या दृष्टीने सर्वेक्षण होऊन विविध बैठका घेत दुरुस्त्या करत प्रस्ताव सादर झाला होता. अखेर त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने योजना मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील बहुतांश गावांना जलजीवन मिशन योजनेचा लाभ मिळावा म्हणून अभ्यास पूर्ण योजना व्हावी, म्हणून नगर नाशिक मंत्रालय स्तरावर प्रयत्न करण्यात आले. या सर्वच योजनांना निधी मिळणार असून काही योजनांना कार्यारंभ आदेश मिळाले आहेत. वाड्यावस्त्यांवर विखुरलेल्या नागरिकांनाही योजनेचा लाभ व्हावा म्हणून काही ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. यात काही गावांचा समावेश करण्यात आला आहे प्रशासकीय मान्यता मिळाल्याने वांबोरी शहर व परिसरातील नागरिकांनी ना. तनपुरे यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या