Thursday, April 25, 2024
Homeजळगावआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी गुरुजींच्या मुलाखती

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी गुरुजींच्या मुलाखती

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्याभरातून 31 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.

- Advertisement -

या प्राप्त अर्जाची छाननी सुद्धा निवड समितीकडून करण्यात आली आहे. आता दि.31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद विद्यानिकेतन येथे पात्र शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातून जळगाव-2 अर्ज, चोपडा-1 यावल-1, रावेर-1, मुक्ताईनगर-3, भुसावळ-2, बोदवड-2, जामनेर-2, पाचोरा-2, चाळीसगाव- 3, भडगाव-3, पारोळा-1, एरंडोल-1, धरणगाव-3, अमळनेर-4 अर्ज असे एकूण 31 अर्ज जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.

मुक्ताईनगर, चाळीसगाव,भडगाव,धरणगाव या तालुक्यातून प्रत्येक 3 अर्ज तर अमळनेरमधून 4 अर्ज असे एकूण 31 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या निवड समितीमध्ये आता आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील गुरुजींची दि. 31 रोजी सकाळी 11 ते सायंकाळ 6 वाजेपर्यंत जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात मुलाखती होणार आहे.

त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील, सीईओ डॉ.बी.एन.पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, डॉएट प्राचार्य मंजूश्री क्षीरसागर आदींची निवड समितीमध्ये समावेश आहे.

जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्या रावेर तालुक्यातून एकच अर्ज असल्याने त्यांची डोकेदुखी कमी झाली आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातून सर्वाधिक 4 तर चाळीसगाव,भडगाव,धरणगाव तालुक्यातून प्रत्येकी 3 अर्ज असल्याने राजकीय पदाधिकार्‍यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या