Saturday, April 27, 2024
Homeजळगावपी.एम केअर्सव्दारा जिल्ह्याला 80 व्हेंटीलेटर

पी.एम केअर्सव्दारा जिल्ह्याला 80 व्हेंटीलेटर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक दिवसागणिक वाढत असल्याने पी.एम केअर्सव्दारे…

- Advertisement -

जळगाव जिल्ह्याला 80 व्हेंटीलेटर जिल्हाप्रशासनाने उपलब्ध केली आहेत. रुग्णांना वेळेवर सुविधा मिळाल्यानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणार आहे.

जिल्हयात मार्चमहिन्याच्या अखेरीस कोविड रूग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून योग्य ती कारवाई झाल्यानंतर काही दिवसांत जिल्हा कोरोनामुक्त होउन ग्रीनझोनमधे गेला होता.

परंतु मे एप्रिलच्या महिन्यानंतर लॉकडाउन असूनसुद्ध कोविड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या सात आठ दिवसांपासून मोठया प्रमाणात उद्रेक दिसून येत आहे. याअनुषंगाने कोविड-19च्या प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत पीएम केअर्सव्दारा जिल्हयासाठी 80 ऑक्सीजन व्हेंटीलेटर्स उपलब्ध झालेले असून उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयांना वितरीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासन सुत्रांंनी दिली.

जिल्हयात कोरोना प्रसार प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा आरोग्य यंत्रणा, सामान्य रूग्णालय, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर केल्या जात आहेत. जिल्हयात सुमारे15 ते 20च्यावर केंद्रात कोवीड अंतर्गत दाखल असलेल्या रूग्णांवर उपचार केले जात आहेत. या रूग्णांना आवश्यक असलेल्या व्हेंटीलेटर्सचा पुरवठा पीएमकेअर्स अंतर्गत जिल्हा प्रशासनाला गेल्या काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाला आहे.

गत जुन जुलैमधे आटोक्यात असलेली कोरोना बाधीतांची संख्या ऑगस्टनंतर सद्यस्थितीत 30हजारांच्या घरात पोचली असून रूग्णांना आवश्यक असलेली सुविधा देण्यासाठी जिल्हयातील उपजिल्हा रूग्णालय,ग्रामीण रूग्णालय अशा 21 ठिकाणी 80 व्हेंटीलेटर्स पोचते करण्यात आले आहेत. जामनेर,मुक्ताईनगर, चोपडा उपजिल्हा रूग्णालयांत प्रत्येकी 10, पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ ग्रामीण रूग्णालयात प्रति 5नग,

तर रावेर.धरणगांव,एरंडोल, पारोळा,भडगांव ग्रामीण रूग्णांलयांना प्रत्येकी 3 तर वरणगांव, बोदवड, पहूर,यावल यांना प्रत्येकी दोन नग शिवाय पाल,पिंपळगाव (हरे),न्हावी आदी ठिकाणी प्रत्येकी 1नग असे पीएमकेअर्सव्दारा प्राप्त झालेले व्हेटींलेटसचे जिल्हयात 21 ठिकाणी वितरण केले असून रूग्णांना कशा प्रकारे लाभ देण्यात येत आहे याची देखिल पहाणी करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या