Friday, April 26, 2024
Homeजळगावरेल्वे स्थानकाजवळील शोरुम फोडले

रेल्वे स्थानकाजवळील शोरुम फोडले

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

रेल्वे स्थानकाजवळील सागर सेल्स हे शोरुम चोरट्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास फोडून

- Advertisement -

सव्वा तीन लाख रुपये लांबवले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रेल्वे स्थानकाजवळ भरत बियाणी यांचे सागर सेल्स हे फूटवेअरचे होलसेल विक्रीचे शोरुम आहे. बुधवारी पहाटे सफेद रंगाच्या कारमधून पाच जण उतरले आणि त्यांनी शटर वाकवून शोरुममध्ये प्रवेश केला.

या घटनेबाबत रेल्वे स्टेशन रोडवर पहारा देणार्‍या गुरख्याला संशय आला. त्याने तत्काळ शोरुमचे संचालक बियाणी यांना फोन करुन कारमधून उतरलेल्या व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींबाबत कळविले.

याबाबत कळतात बियाणी यांनी तातडीने शोरुम गाठले. बियाणी यांना शोरुमचे शटर वाकवलेले दिसले. त्यांनी आत जावून बघितले असता चोरट्यांनी शोरुमधील ड्रावर तोडून त्यातील सव्वातीन लाखांची रक्कम लांबविल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी भरत बियाणी यांनी फिर्याद दिली. त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या