Saturday, April 27, 2024
Homeजळगाव‘त्या’ मृत महिलेच्या कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई

‘त्या’ मृत महिलेच्या कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई

मुंबई – Mumbai :

जळगावच्या सिव्हिल रुग्णालयात कोरोनार उपचार घेत असलेल्या 82 वर्षीय महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळून आला होता.

- Advertisement -

या प्रकरणाची गंभीर दखल घेत हायकोर्टाने त्या महिलेच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शवविच्छेदन अहवाल पुढील सुनावणीवेळी कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

कोरोनाने ग्रस्त एक 82 वर्षीय वृद्ध महिला जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत होत्या. 2 जूनला त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या.

त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी त्यांचा मृतदेह त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळून आला.

कोविड रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना राज्य तसेच केंद्र सरकारने आखून दिलेली नियमावली अंमलात आणावी अशी मागणी करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

आशिष शेलार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी आहे. त्यावेळी जळगाव शासकीय रुग्णालयातील हा प्रकार हायकोर्टाच्या निर्दशनास आणून देण्यात आला.

हा प्रकार अत्यंत भयावह असून यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे मत मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केले. आठ दिवसांनी मृतदेह मिळाल्याने कदाचित उपासमार झाल्यामुळेही हा मृत्यू झालेला असू शकतो अशी शंकाही हायकोर्टाने व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या