Thursday, April 25, 2024
Homeजळगावव्हीआयपी क्रमांकाच्या विक्रीतून आरटीओ मालामाल

व्हीआयपी क्रमांकाच्या विक्रीतून आरटीओ मालामाल

किशोर पाटील

जळगाव । Jalgaon

- Advertisement -

आपल्या वाहनानां व्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठी वाहनचालक वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात. या अनोख्या क्रेझमुळे आरटीओच्या तिजोरीमध्ये चांगलाच महसूल जमा होत असतो.

गेल्या वर्षात म्हणजे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या नऊ महिन्यांच्या कालावधीत व्हीआयपी वाहन क्रमांक विक्रीतून 1 कोटी 40 लाख 89 हजार 500 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तब्बल 1 हजार 909 जणांनी पैसे भरुन आपल्या प्रसंती क्रमांकाची हौस पूर्ण केली आहे. अशी माहिती जळगाव आरटीओचे वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांनी दिली.

वाहनांना व्हिआयपी क्रमांक मिळावा म्हणून अनेक जण आपला वाढदिवस, लग्नाची तारीख, किंवा अंकशास्त्रानुसार लकी नंबर क्रमांक मिळवा यासाठी ज्यादा पैसे मोजण्याची अनेकांची तयारी असते. जळगाव जिल्ह्यात 1 हजार 909 क्रमांकाचे उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत रजिस्टे्रशन करण्यात आले. त्यानुसार नागरिकांनी पसंती क्रमांकानुसार विभागाकडून ठरविण्यात आलेल्या किमतीनुसार आपल्या चारचाकी तसेच दुचाकीसाठी पैसे भरुन पसंतीचा क्रमांक मिळविला आहे.

7777 क्रमाकाची 2 लाख 10 हजारात विक्री

आरटीआने दिलेल्या माहितीनुसार 7777 या क्रमाकाची 2 लाख 10 हजार रुपयात विक्री झाली. याप्रमाणे एका जणाने प्रत्येकी 2 लाख 10 हजार रुपये भरुन आपली व्हीआयपी क्रमांकाची हौस पूर्ण केली आहे. तर त्याचप्रमाणे दोन जणांना एक आकडी व्हिआयपी नंबर घेतला आहे. अशाप्रकारे तीन जणांनी घेतलेल्या पसंतीच्या क्रमाकाव्दारे 5 लाख 10 हजार रुपयांचा महसूल आरटीओला मिळाला आहे.

76 जणांनी केले 50 हजार रुपये किमतीचे क्रमांक खरेदी

पाच हजार रुपयापासून ते अडीच लाख रुपयापर्यंत किमतीचे क्रमांक विक्री झाले आहेत. हौसेला मोल नसतं, त्याप्रमाणे मनासारखा व पसंतीच्या एका क्रमांकासाठी 76 काहींनी चक्क 50 हजार रुपये मोजले आहेत. तर 10 जणांनी 50 हजार ते 1 लाख रुपये किमतीचे क्रमांक खरेदी केले आहेत. सर्वाधिक पाच हजार रुपये किमतीचे एकूण 1 हजार 366 जणांनी क्रमांक खरेदी केले आहेत. 5 हजार ते 7 हजार 500 रुपयापर्यंत किमतीचे एकूण 260 क्रमांक विक्री झाले आहेत. याप्रमाणे एकूण 1 हजार 909 जणांनी क्रमांक खरेदी केली असून त्याव्दारे 1 कोटी 40 लाख 89 हजार 500 रुपयांचा महसूल आरटीओला मिळाला आहे. अशी माहिती वसूली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या